काजू-किशमिश पुलाव रेसिपी
रोज तेच जेवण जेऊन अनेकांना कंटाळला येतो. तसेच अनेक वेळेस काहीतरी चवदार खावेसे वाटते. म्हणून आज आपण पाहणार आहोत काजू किशमिश पुलाव रेसिपी. ही रेसिपी बनवायला देखील तेवढीच सोप्पी आहे. तर चला जाणून घेऊ या काजू किशमिश पुलाव रेसिपी.
साहित्य-
अर्धा कप तांदूळ
10-15 काजूचे तुकडे
मनुका 10 ते 15
वेलची पूड
लवंग
काळी मिरी
अर्धा चमचा जिरे
एक लाल मिरची
2चमचे तूप
चवीनुसार मीठ
कृती-
सर्वात आधी अर्धा कप तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या व कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजलेला भात एका भांड्यात काढून घ्या. आता गॅस वर कढई ठेवावी. कढई मध्ये तूप घालावे. आता यामध्ये लाल मिरची,लवंग, जिरे घालावे. त्यानंतर यामध्ये काजू घालावे. तसेच किशमिश घालावे. व हे परतवून घ्यावे. त्यानंतर यामध्ये शिजलेला भात घालावा. त्यानंतर यामध्ये वेलची पूड, काळे मिरे आणि चवीनुसार मीठ घालावे. तसेच हा पुलाव चांगल्याप्रकारे परतवून घ्या. तर चला तयार आहे आपला काजू किशमिश पुलाव, गरम सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik