दुधी भोपळ्याचे भरीत रेसिपी
दुधी भोपळ्याचे भरीत फक्त चावीलाच नाही तर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. तसेच लंच मध्ये पराठा किंवा पुरी सोबत देखील नेऊ शकतात. तसेच ज्यांना दुधी भोपळाची भाजी आवडत नाही ते देखील हे भरीत बोट चाटून नक्कीच खातील. तर चला जाणून घ्या रेसिपी
साहित्य-
1 दुधी भोपळा
2 टोमॅटो
1 मोठा कांदा
1 छोटा चमचा आले लसूण-पेस्ट
1 छोटा चमचा जिरे
चिमूटभर हिंग
2 सुक्या मिरची
1 छोटा चमचा हळद
1 छोटा चमचा गरम मसाला
1 मोठा चमचा कोथिंबीर
मीठ चवीनुसार
कृती-
सर्वात आधी दुधी भोपळा धुवून त्याचे साल काढून घ्यावे. आता दुधी भोपळा किसून त्यामध्ये कांदा, टोमॅटो बारीक चिरून मिक्स करून बाजूला ठेवावे. आता एका पॅनमध्ये तेल घालून त्यामद्ये हिंग, जिरे, सुखी मिरची घालावे. मग आले लसूण पेस्ट कढईमध्ये घालावी. व यानंतर कांदा घालून परतवून घ्या. यानंतर टोमॅटो घालावा.
तसेच यामध्ये आता हळद, गरम मसाला, मीठ आणि किसलेला भोपळा घालावा. व पाच मिनिट शिजू द्यावे. यानंतर यावर कोथिंबीर घालून गार्निश करावे. तर चला तयार आहे आपले दुधी भोपळ्याचे भारित, जे तुम्ही पराठा किंवा पुरीसोबाबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik