गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

पोषकतत्वांनी भरपूर मुगाचा ढोकळा रेसिपी

ढोकळा हा पदार्थ जवळजवळ सर्वांनाच आवडतो. आजपर्यंत तुम्ही रवा, बेसनाचा अगदी तांदळाच्या पिठाचा देखील ढोकळा खाल्ला असले. पण आज आपण पोषक तत्वांनी भरपुर असा हिरव्या मुगाचा ग्रीन ढोकळा पाहणार आहोत. ज्यामुळे आरोग्य तर सुरक्षित राहतेच पण तुम्ही हा ढोकळा तुमच्या डाएट मध्ये देखील सहभागी करू शकतात. तर चला जाणून घेऊ या रेसिपी.
 
साहित्य- 
भिजवलेले हिरवे मूग   
आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट 
हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली  
दही    
चवीनुसार मीठ 
तेल 
कढीपत्ता 
 
कृती-
सर्वात आधी एका मिक्सर ग्राइंडरमध्ये भिजवलेले मूग, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि दही टाकावे. व याची पेस्ट बनवून घ्या. पेस्ट बनल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढावी. तसेच त्यामध्ये रवा आणि पाणी, मीठ घालावे.  
 
आता हे मिश्रण मिक्स करून 10 ते 15 मिनिट बाजूला ठेऊन द्यावे. आता ताटलीला तेल लावून घ्यावे. व हे मिश्रण ताटलीमध्ये काढावे. व मिडीयम गॅस वर 15 मिनिट शिजू द्यावे. आता तडका देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करावे तसेच, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी तयार करून घ्या. आता ढोकळा शिजल्यानंतर त्यावर ही फोडणी घालावी. व तुम्हाला आवडणाऱ्या त्या आकारात कापून घ्या. वरून कोथिंबीर, आवडीनुसार खोबऱ्याचा किस गार्निश करावा. तर चला तयार आहे आपला आरोग्यदायी ढोकळा, सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik