मुलांना टिफिनमध्ये द्या शेझवान रोल्स
साहित्य -
1 कप मैदा
1 चमचा इंस्टेंट यीस्ट
1 चमचा साखर
1/2 चमचा मीठ
1 चमचा ऑलिव्ह ऑइल
3/4 कप गरम पाणी
फिलिंग भरण्यासाठी-
1 कप बारीक कापलेल्या भाज्या(गाजर, शिमला मिरची, पत्ता कोबी)
2 चमचा शेझवान सॉस
1 चमचा सोया सॉस
1 चमचा लसूण कापलेला
1 चमचा आले कापलेले
चवीनुसार मीठ
काळे मिरे पूड
कृती-
एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, इंस्टेंट यीस्ट, साखर आणि मीठ मिक्स करावे. आता त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालावे. व गरम पाणी घालावे. तसेच नरम पीठ होईस पर्यंत मिक्स मळावे.
पीठ पाच ते सात मिनिट मळावे जेणेकरून ते मऊ आणि लवचिक होईल. तसेच हे मळलेले पीठ एक तास भिजू द्यावे.
आता एका पॅनमध्ये लसूण आणि आले परतवून घ्या. तसेच या मध्ये कापलेल्या भाज्या टाकून पाच ते सात मिनिट परतवून घ्या. तसेच आता यामध्ये शेझवान सॉस आणि सोया सॉस मिक्स करावा. चवीनुसार मीठ आणि मिरेपूड घालावी. दोन मिनिट शिजवून गॅस वरून खाली काढावे आणि थंड होण्याकरिता ठेवावे.
आता मळलेल्या पिठाच्या पोळ्या करून फिलिंगला चांगल्या प्रकारे स्प्रेड करा. आता रोल बेक करावे. तसेच रोल ला 20-25 मिनट सोनेरी कलर येईसपर्यंत भाजावे. आता थंड करून पॅक करावे.
तसेच मुलांच्या टीफीन मध्ये देण्यासाठी आधी थंड होऊ द्यावे. हे रोल खूप स्वादिष्ट और पौष्टिक असतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik