गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (14:38 IST)

Pickles Recipe : कांद्याचे लोणचे

Onion
लोणचे हे भारतातील प्रत्येक व्यक्तीला आवडणारा पदार्थ आहे. तुम्ही आता पर्यंत अनेक लोणच्याचे प्रकार पहिले असतील पण कधी कांद्याचे लोणचे तुम्ही खाल्ले आहे का? कांदा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. कांद्याचा उपयोग अनेक पदार्थानमध्ये करतो पण तुम्हाला माहित हे का या कांद्याचे लोणचे देखील बनवतात. तसेच हे कांद्याचे लोणचे कसे बनवायचे हेच आपण आज पाहणार आहोत. तर चला जाणून घ्या रेसिपी  
 
साहित्य-
काळे तीळ 
आमसूल पावडर 
बडीशोप 
काश्मिरी लाल मिरची 
हळद 
मीठ 
चाट मसाला 
बारीक कापलेली कोथिंबीर 
लिंबाचा रस 
मोहरीचे तेल 
हिंग 
मोहरीची डाळ 
 
कृती-
सर्वात आधी कांद्याचे मोठे तुकडे करून घ्या. व याचे भाग वेगळेवेगळे करा. आता हिरवी मिरची दोन भागांमध्ये उभी चिरावी. आता या कांद्यामध्ये मसाले मिक्स करावे. तसेच अर्धा चमचा बडीशोप घालावी. यासोबत काश्मिरी दोन चमचे लाल मिरची घालावी. तसेच हळद घालावी.आता चाट मसाला आणि आमसूल पावडर मिक्स करावी. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.  
 
तसेच आता वरून फोडणी घालण्यासाठी पण गरम करून त्यामध्ये हिंग घालावा. सोबत काळे तीळ आणि मोहरीची डाळ घालावी. व ही फोडणी कांद्यावर घालावी. तसेच चांगल्या प्रकारे मिक्स करून पाच मिनिट तसेच ठेवावे. तर चला तयार आहे आपले कांद्याचे लोणचे. जे तुम्ही पराठे, पुरी, खिचडी इत्यादी सोबत खाऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik