रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (12:26 IST)

झटपट तयार होणारी पालक कॉर्न भाजी

Palak Corn bhaji
साहित्य-
अर्धा किलो पालक 
चार टोमॅटो 
चार हिरवी मिरची 
एक इंच आले तुकडा 
एक वाटी स्वीट कॉर्न 
एक कांदा 
अर्धा चमचे तिखट 
अर्धा चमचा हळद 
चवीनुसार मीठ 
अर्धा चमचे जिरे 
दोन चमचे धणे पूड 
 
कृती-
सर्वात आधी पालक धुवून उकडवून घ्यावा. आता मिक्सरमध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, आले, कांदा घालून बारिक करून घ्या. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालावे, मग हळद, तिखट, धणे पूड घालून बारीक केलेले मिश्रण घालावे. नंतर मीठ घालून ही प्युरी शिजू द्यावी. आता पालक बारीक करून या ग्रेव्हीमध्ये घालावा. आता स्वीट कॉर्न धुवून पाच मिनिट गरम पाण्यात घालावे व नंतर चाळणीच्या मदतीने पाणी कडून घ्यावे. आता हे स्वीट कॉर्न ग्रेव्ही मध्ये घालावे. आता ही भाजी काही वेळ शिजू द्यावी.  तर चला तयार आहे आपला स्वीट कॉर्न पालक रेसिपी, गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik