कणसाचे लसूण कबाब
सामग्री- मक्याची चार कणसे, बटाटे, ४ ब्रेडचे तुकडे, लसणाच पाकळ्या, आल्याचा तुकडा, कोथींबीर, जीरे, अर्धा चमचे धने, २ हिरव्या मिरच्या, लाल मिरची एक चमचा, अमचूर अर्धा चमचा, मीठ गरजेनुसार. तेल.
विधी- कणसे धुऊन घ्यावीत. त्याचे मोठे तुकडे करावेत. बटाटे उकळून घ्यावेत व ते स्मॅश करावेत. ब्रे़डचे तुकडे पाण्यात भिजवून दोन्ही हाथांनी चांगले दाबून त्यातील पाणी काढून घ्या.
आता कणसाचे दाणे, स्मॅश केलेला बटाटा, ब्रेड व कापलेली मिरची, कोथींबीर, आले, लसूण, जीरा, धने, मीठ, अमचूर सगळे एकत्र करा. एका कढईत तेल गरम करा. त्याचे मिश्रण करून हातांनी लहान लहान गोळे तयार करा. त्यांना चांगले तळा. त्यानंतर त्याला चटणी व टॉमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.