1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (14:03 IST)

दही कबाब रेसिपी

संध्याकाळी चहा सोबत किंवा स्नॅक्स म्हणून दही कबाब खूपच शानदार रेसिपी ठरते. स्वादिष्ट दही कबाब तयार करणे सोपे आहे. जाणून घ्या कृती- 
 
सामुग्री- 
दही- 1 कप 
बेसन- 5 मोठे चमचे 
कोथिंबीर- 1 मोठा चमचा बारीक चिरलेली
आलं- 1/2 लहान चमचा कापलेलं
कांदा- 2 मोठे चमचे बारीक कापलेले
हिरवी मिरची- 1/2 लहान चमचा बारीक कापलेली
जिरपूड- 1/2 लहान चमचा
गरम मसाला पावडर- 1/2 लहान चमचा 
मिरपूड-1/4 लहान चमचा
तेल- गरजेप्रमाणे
मीठ- चवीनुसार
 
कृती
हे तयार करण्यासाठी सर्वात आधी दह्याला कपड्यात बांधून पाणी काढून घ्या.
नंतर दही 8 तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. 
एका पॅनमध्ये हलकं बेसन भाजून, रंग बदलू नये याची काळजी घ्या.
आता एका बाउलमध्ये बेसन, मिरच्या, कांदे, मीठ, आलं व इतर मसाले टाकून मिसळा.
नंतर यात दह्याचं पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करुन घ्या.
हे मिश्रण हातावर पसरवून त्यात दही ठेवून कबाबचा आकार द्या.
हे कबाब तयार करुन जरावेळ फ्रिज मध्ये ठेवून द्या.
नंतर तेल गरम करुन सोनेरी होयपर्यंत तळून घ्या.
आपले दही कबाब चटणीसोबत सर्व्ह करा.