शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : बुधवार, 22 मार्च 2023 (16:42 IST)

Gudipadwa Special Recipe कडुलिंबाच्या फुलांची व पानांची चटणी

neem
गुढीपाडवा हा खास दिवस कारण या दिवशी हिंदू शालिवाहन वर्षाची सुरुवात होते तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा सण साजरा करत आम्ही गुढी उभारतो. या दिवशी काही विशेष पदार्थांचे सेवन करण्याची परंपरा आहे. या दिवशी गुढीला आपण कडुनिंबाच्या झाडाची डहाळी बांधतो, कडुनिंबाची चटणी खातो. तर चला जाणून घ्या की आरोग्यदायी चटणी कशी तयार केली जाते.
 
साहित्य - कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, मीठ, जिरेपूड, मिरेपूड, हिंग आणि गूळ.
कृती - सर्व साहित्य एकत्रित वाटून घ्यावं. अनाशापोटी प्राशन करावं
 
विशेष टीप - पाने तुपावर परतून देखील वापरता येतील.
आपण थोडी हरभऱ्याची भिजलेली डाळ वाटणात घालू शकता.