Marathi Biodata Maker
✕

कुरकुरीत आणि आतून मऊ नाश्ता High-Protein Soya-Chickpea Cheesy Balls

Updated: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 (17:24 IST)
कोथिंबीर: बारीक चिरलेलीलाल 
तिखट: १ लहान चमचा
जिरे पूड: १/२ लहान चमचा
चाट मसाला: १/२ लहान चमचा
गरम मसाला: १/२ लहान चमचा
मीठ: चवीनुसार
ब्रेड क्रम्स : १ कप (बाहेरून कुरकुरीतपणासाठी)
कॉर्नफ्लोअर : २ चमचे (पाण्यात विरघळवून स्लेरी बनवण्यासाठी)
चीज क्यूब्स: लहान तुकडे केलेले (मोजझेरेला किंवा प्रोसेस्ड चीज)
तेल: तळण्यासाठी
 
कृती-
सोया आणि चणे तयार करणे:
सोया ग्रॅन्युल्स १० मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा, नंतर त्याचे पूर्ण पाणी पिळून घ्या. भिजवलेले चणे पाण्याशिवाय मिक्सरला थोडे जाडसर वाटून घ्या.
 
मिश्रण एकत्र करणे:एका मोठ्या बाऊलमध्ये पिळलेले सोया ग्रॅन्युल्स, वाटलेले चणे, उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, सर्व मसाले (तिखट, जिरे पूड, चाट मसाला, गरम मसाला) आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव मळून घ्या.
 
बॉल्स वळणे व चीज भरणे:या मिश्रणाचे लहान गोळे करा. हातावर गोळा पसरवून त्याच्या मध्यभागी एक चीजचा तुकडा ठेवा आणि सर्व बाजूंनी बंद करून गोल बॉल्स तयार करा.
 
कोटिंग करणे:तयार बॉल्स आधी कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणात (स्लेरी) बुडवा आणि नंतर लगेचच ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या, जेणेकरून ब्रेड क्रम्स सर्व बाजूंनी व्यवस्थित लागतील. (असे केल्याने बॉल्स कुरकुरीत होतात).
 
तळणे :कढईत तेल मध्यम गरम करा. तयार चीझी बॉल्स मंद ते मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. बॉल्स तळताना तेलात चीज बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. हे सोया-चणे चीझी बॉल्स गरम गरम टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणीसोबत खायला उत्तम लागतात.
ALSO READ: मुलांसाठी झटपट तयार होणारे आणि चवदार असे १० आरोग्यदायी स्नॅक्स
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: गरमागरम चहासोबत झटपट तयार होणारे ५ पारंपरिक मराठी स्नॅक्स
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मखाना स्नॅक्स: चवदार, कुरकुरीत आणि आरोग्यासाठी वरदान!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

गुडघ्यांचा काळेपणा दूर करायचा आहे? त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

Kitchen Hacks डाळिंबाचे दाणे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या सोप्या पद्धतींचा अवलंब करा

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

तुम्हाला माहित आहे का? या प्राण्याला असतात सुमारे २५,००० दात; जाणून आश्चर्य वाटेल

पुढील लेख
Show comments