गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : गुरूवार, 14 डिसेंबर 2023 (21:53 IST)

Aloo Gobi Kebab घरीच बनवा चविष्ट बटाटा गोबी कबाब , रेसिपी जाणून घ्या

Galouti Kebab
Potato Gobi Kebab: लहान मुलांना बटाटा -फ्लॉवर(गोबी)ची भाजी खूप आवडते. अनेकदा जास्त बनते आपण ती दुसऱ्या दिवशी फेकून देतो. उरलेल्या बटाटा-गोबीच्या भाजीने आपण अनेक उत्कृष्ट आणि स्वादिष्ट पाककृती बनवू शकता.या भाजीने आपण कबाब देखील बनवू शकतो. हे खाण्यासाठी चविष्ट असतात. लहान मुलं देखील हे आवडीनं खातील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य
 
1 वाटी उरलेली आलू गोबीभाजी 
1 बटाटा उकडलेला  
2 कांदे  (बारीक चिरलेले)
 1 टीस्पून चाट मसाला
अर्धा टीस्पून गरम मसाला
मीठ - चवीनुसार
1 टी स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली 
हिंग - 1/4 टीस्पून
1 टीस्पून ब्रेड स्क्रम्ब  
1 टीस्पून लाल मिरची पावडर
2 चमचे तेल  (तळण्यासाठी)
 
कृती- 
सर्वप्रथम उरलेले बटाटे एका भांड्यात घालून चांगले मॅश करा. त्यात कांदा, इतर साहित्य जसे तिखट, हिंग, गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि उकडलेले बटाटे घाला.
सर्वकाही नीट मिक्स केल्यानंतर कबाबचा आकार द्या.
नंतर कढईत तेल गरम करा.
आता पॅनमध्ये ब्रेड क्रंबमध्ये कबाब गुंडाळा.
दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्या.
बटाटा-कोबीची भाजी कबाब तयार 
 हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

Edited by - Priya Dixit