Garlic Paratha : हिवाळ्यात बनवा स्पेशल लसूण पराठा, रेसिपी जाणून घ्या
Garlic Paratha : हिवाळ्याच्या मोसमात, आपल्याला असे काहीतरी खावेसे वाटते जे चविष्ट असून आरोग्यदायी असावे. हिवाळ्यात पराठे खाणे सर्वानाच आवडतात. आपण पालक, मेथी, बटाटा, शेव, कोबी, फ्लॉवर ,पनीर, पराठे नेहमीच खालले आहे. हिवाळ्यात बनवा खास चविष्ट आणि पौष्टीक लसणाचे पराठे. लसूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि हिवाळ्यात ते खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य-
लसणाच्या पाकळ्या
गव्हाचं पीठ
हिरव्या मिरच्या
तूप
तेल
मीठ
काली मिरी
ओवा
गरम मसाला
कृती-
लसूण पराठा बनवण्यासाठी प्रथम लसूण सोलून बारीक चिरून घ्या.
नंतर हिरव्या मिरच्या धुवून बारीक चिरून घ्या.
आता चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची मिक्स करा, मीठ आणि ओवा घाला आणि नंतर चांगले मिक्स करा. लसूण सारण तयार .
पीठ मळून घ्या आणि त्यात मीठ, मिरची,ओवा, गरम मसाला आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा.
नंतर पीठ 10 मिनिटे सेट करण्यासाठी सोडा
त्यानंतर 10 मिनिटांनी हलके तेल लावून पीठ मऊ करा.
आता त्याचे छोटे गोळे करून थोडे लाटून घ्या.लाटल्यावर लसूण सारण पिठात भरा.
नंतर पीठ बंद करून त्याला गोल टिक्कीचा आकार द्या आणि पोळीच्या आकारात लाटून घ्या.
यानंतर तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी चांगले शिजू द्या, तूप लावून पुन्हा शिजवा.
आता तुमचा लसूण पराठा तयार आहे, चटणीबरोबर सर्व्ह करा.
Edited by - Priya Dixit