रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (15:30 IST)

Lunch Recipe: मुलांच्या डब्यासाठी बनवा हे सोपे सॅन्डविच, रेसिपी जाणून घ्या

लहान मुलांना जेऊ घालणे प्रत्येक आईसाठी काळजीचा विषयच आहे. प्रत्येक आईची तक्रार असते की तिचे मूल खातच नाही किंवा त्याच्या आवडीचं दिलं तरच खातो. मुले घरी असतील तर त्यांना घरातील सदस्य किंवा आई भरवते. पण शाळेत मुले जेवतच नाही. यामुळे प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी जेवणाच्या डब्यात असे पदार्थ पॅक करते, जे ते सहज खाऊ शकतात. मुलांच्या डब्यात तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ दिल्यावर ते खात नाही. तुम्ही त्यांना आवडेल अशे पदार्थ देखील अधून मधून देऊ शकता. या साठी व्हेज सँडविच, व स्वीट कॉर्न सँडविच हे दोन प्रकाराचे सॅन्डविच डब्यात देऊ शकता. जेणे करून तो शाळेतून डबा पूर्ण रिकामा करून आणेल. चला  तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
1 व्हेज सँडविच साठी लागणारे साहित्य
ब्रेडचे स्लाइस 
ताज्या भाज्या (टोमॅटो, कांदा, काकडी, कोबी, गाजर इ.)
चटणी आणि मेयॉनीज 
मीठ, मिरपूड, चाट मसाला
 
कृती :
सर्वप्रथम ताज्या भाज्या धुवून त्याचे छोटे तुकडे करून घ्या. आता ब्रेडच्या स्लाइसवर चटणी, एका बाजूची चटणी आणि नंतर मेयॉनीज लावा. नंतर त्यावर चिरलेल्या भाज्या ठेवा.
भाज्यांवर मीठ, मिरपूड आणि चाट मसाला घाला. त्यामुळे भाज्यांची चव वाढेल. आता दुसऱ्या ब्रेड स्लाइसने झाकून ठेवा. टिफिनमध्ये ठेवण्यापूर्वी त्याचे दोन भाग करा
 
 
2 स्वीट कॉर्न सँडविच साठी लागणारे साहित्य
स्वीट कॉर्न (उकडलेले)
ब्रेडचे स्लाइस 
टोमॅटो (चिरलेला)
कांदा (चिरलेला)
कोथिंबीर (चिरलेली)
मीठ, मिरी पावडर
चटणी किंवा मेयॉनीज 
 
कृती : 
हे सँडविच बनवण्यासाठी एका भांड्यात उकडलेले स्वीट कॉर्न मीठ, काळी मिरी पावडर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर इत्यादी मिसळा.
यानंतर ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर चटणी किंवा मेयोनीज लावा. आता ब्रेडच्या स्लाइसवर स्वीट कॉर्न आणि भाज्यांचे मिश्रण ठेवा आणि दुसऱ्या ब्रेड स्लाइसने झाकून ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते ग्रिल करून टिफिनमध्ये ठेवू शकता.

Edited by - Priya Dixit