रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (15:51 IST)

Ragi Dosa नाचणी डोसा

नाचणी डोसा साठी साहित्य - 2 कप नाचणीचे पीठ, अर्धा कप तांदळाचे पीठ, अर्धा कप आंबट दही, 4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप चिरलेला कांदा, मीठ चवीनुसार, अर्धा लहान चमचा मोहर्‍या, 1 टीस्पून जिरे, 5-6 कढीपत्ता, 1 टीस्पून तेल
 
कृती- 
नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ, दही, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ बनवा आणि 2 तास बाजूला ठेवा. तेल गरम करा आणि फोडणीसाठी सर्व साहित्य घाला. मोहरी तडतडायला लागल्यावर पिठात घाला. एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि त्यावर तेल घाला आणि हलके गरम करा. गरम झाल्यावर त्यात मिश्रण टाका, वर्तुळात पसरून पातळ डोसा बनवा आणि एका बाजूला शिजवा. शिजवताना त्याच्या कडांना थोडे तेल घाला. दोन्ही बाजूंनी शिजल्यावर गरमागरम डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.