शनिवार, 28 सप्टेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पोटली कचोरी, जाणून घ्या रेसिपी

जर तुम्ही एकच प्रकारचे स्नॅक्स खाऊन खाऊन कंटाळले असाल तर, संध्याकाळी चहा सोबत तुम्ही नक्कीच पोटली कचोरी ट्राय करू शकता त. तर चला जाणून घेऊ या पोटली कचोरी रेसिपी 
 
साहित्य 
मैदा 
भिजवलेली मुगडाळ 
तेल 
जिरे पूड 
गरम मसाला 
धणे पूड 
बडीशोप पूड 
हिंग 
आमसूल पावडर 
तिखट 
हिरवी मिरची 
आले 
मीठ 
 
कृती 
पोटली कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी मैद्यामध्ये तेल गरम करून घालावे. मग थोडे थोडे पाणी घालून मळावे. मग गोळा तयार झाल्यानंतर बाजूला ठेऊन द्या. भिजवलेल्या मुगाच्या डाळीला बारीक करून पेस्ट तयार करा. आता पॅन मध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये हिंग, जिरे पूड, धणे पूड, बडीशोप पावडर, हिरवी मिरची, आले पेस्ट घालावी. हे मिश्रण चांगल्या प्रकारे परतवावे. आता यामध्ये बारीक केली मुगाच्या डाळीची पेस्ट सोबत मीठ, तिखट, गरम मसाला, आमसूल पावडर घालावी. आता डाळ कोरडी होइसपर्यंत परतावी. आता हाताला तूप लावून छोटे छोटे गोळे तयार करवून त्यामध्ये हे मिश्रण भरावे व गोलाकार आकार द्यावा. मग दोन्ही बाजूंनी कचोरी मध्यम गॅस वर तेलात तळून घ्यावी. तर चला तयार आहे आपली गरम गरम पोटली कचोरी, तुम्ही हे सॉस, चटणी सोबत देखील सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik