बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शनिवार, 13 एप्रिल 2024 (10:18 IST)

Make Raisin at Home : द्राक्षांनी घरीच बनवा मनुका, जाणून घ्या त्याची सोपी पद्धत

Make Raisin at Home :  आपण जेंव्हा काही पदार्थ बनवतो तेंव्हा ते पदार्थ चवदार असायला हवेत, त्यासोबतच त्यात पौष्टिक गुणधर्मही असायला हवेत याची पूर्ण काळजी घेतो. जेणेकरून हे खाल्ल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. आपण घरी काहीतरी गोड बनवतो  मग ती खीर असो वा हलवा, आपण त्यात भरपूर ड्रायफ्रुट्स घालून त्याची चव अनेक पटीने वाढवतो.त्यात मनुका किंवा बेदाणे आवर्जून टाकतो. 
 
मनुकामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात, जे शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करतात. जर तुम्ही ते बाजारातून विकत घेतले तर ते खूप महाग मिळते, परंतु जर तुम्ही ते घरी बनवले तर तुमचे बरेच पैसे वाचतील.चला तर बेदाणे घरी बनवण्याची रेसिपी जाणून घेऊ या.
 
साहित्य-
एक किलो द्राक्षे
स्टीमर
 
कृती- 
घरी बेदाणे बनवायचे असतील तर प्रथम एक किलो द्राक्षे घेऊन ती नीट धुवून घ्या. नीट धुऊन झाल्यावर त्याचा देठ काढून वेगळा करा.जर तुमच्याकडे इडली स्टीमर असेल तर ते पुरेसे आहे, अन्यथा स्टीमर म्हणून साधा स्टीमर वापरा. 
 
स्टीमरमध्ये त्याच्या आकारानुसार पाणी भरा. स्टीमरच्या ट्रेमध्ये द्राक्षे भरून गॅसवर ठेवा. साधारण वीस मिनिटांनी गॅस बंद करून स्टीमर उघडल्यावर तुम्हाला द्राक्षांचा पिवळा रंग दिसेल. रंग बदलल्यानंतर ते बाहेर काढून सुती कापड्यावर ठेवा आणि सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी पसरवा. दोन ते तीन दिवस असेच कोरडे राहू द्यावे.
ठराविक काळानंतर  तुम्हाला दिसेल की द्राक्षे लहान होऊ लागतील. कोरडे करताना लक्षात ठेवा की ते वेगळे राहतील. अन्यथा त्याच्या चवीवर परिणाम होऊ शकतो. तिसर्‍या दिवशी तुम्ही पंख्याखाली सुकवण्यासाठी ठेवा. तुमचे मनुके तयार आहेत. एअर टाईट डब्यात ठेवून तुम्ही वर्षभर वापरू शकता.
 



Edited by - Priya Dixit