1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (10:09 IST)

पालकाची भजी

साहित्य- 
20-25 पालकाची पाने, धुवून- वाळवलेली
1 वाटी बेसन
मीठ चवीप्रमाणे
तिखट अर्धा चमचा
तळण्यासाठी तेल

कृती-
एका बाऊलमध्ये बेसन, मीठ, तिखट आणि 3/4 पाणी टाका आणि चांगल्याप्रकारे मिसळून 15 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
आता एका कढईत तेल गरम करा आणि बेसनाच्या मिश्रणात 1 मोठा चमचा मोहन घाला.
प्रत्येक पालकाच्या पानाला बेसनच्या मिश्रणात बुडवून तेलात टाका.
तळून टिशू पेपरवर काढा.
सर्व्ह करताना आवडीप्रमाणे चाट मसाला किंवा जीरपूड घालू शकता.