प्रतिकारक शक्ती वाढवणारी कांदा आणि कच्च्या कैरीची कोशिंबीर
कोरोनाचे संसर्ग प्रतिकारक शक्ती कमकुवत आल्यावर होते. उन्हाळ्यात कांदा आणि कच्च्या कैरीची कोशिंबीर प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य -
1 मोठ्या आकाराची कच्ची कैरी, 1 मोठा कांदा, 1 हिरवी मिरची,1/2 चमचा तिखट,1/2 चमचा काळ मीठ, 1/2 चमचा जिरेपूड, मीठ, चवीप्रमाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती -
कैरी सोलून बारीक तुकडे करा. कांदा, हिरव्या मिरच्या देखील चिरून घ्या. आता एका भांड्यात चिरलेली कैरी, कांदा,हिरव्या मिरच्या घाला. वरून लाल तिखट जिरेपूड,काळ मीठ,चवीप्रमाणे मीठ घालून मिसळून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.तयार आहे प्रतिकारक शक्ती वाढविणारी कच्च्या कैरीची कोशिंबीर.
टीप: आपण हे अधिकच चविष्ट करण्यासाठी या मध्ये चाट मसाला देखील मिसळू शकता.