1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Ragi Soup Recipe

हिवाळ्यात रात्रीच्या जेवणात आवर्जून घ्या पौष्टिक नाचणीचे सूप; शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा!

हिवाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी नाचणीचे सूप हा एक पौष्टिक आणि चविष्ट पर्याय आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर असते. भाज्यांची जोड दिल्यामुळे या सूपची पौष्टिकता आणखी वाढते.

साहित्य-
२ चमचे नाचणीचे पीठ
१ छोटा कांदा (बारीक चिरलेला)
१ छोटा गाजर (बारीक चिरलेला)
२ चमचे स्वीट कॉर्न
२ चमचे बारीक चिरलेली बीन्स
१ चमचा आले-लसूण पेस्ट
१ चमचा तूप किंवा बटर
२ कप पाणी किंवा भाज्यांचा स्टॉक
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा काळी मिरी पावडर
थोडी कोथिंबीर

कृती-
सर्वप्रथम एका भांड्यात नाचणीच्या पिठात अर्धा कप पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करा. कढईत तूप गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट घाला. आता चिरलेला कांदा, गाजर, बीन्स आणि स्वीट कॉर्न घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. त्यात उरलेले पाणी किंवा भाज्यांचा स्टॉक घाला. पाणी उकळल्यानंतर तयार केलेले नाचणीच्या पिठाचे मिश्रण हळूहळू घाला. सतत ढवळत ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर शिजवा. आता मीठ आणि काळी मिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. सूप घट्टसर झाल्यावर गॅस बंद करा आणि वरून कोथिंबीर घाला. सूप अधिक चविष्ट बनवण्यासाठी त्यात आवडीनुसार मशरूम, पालक किंवा मटार घालू शकता.

नाचणीच्या सूपचे फायदे
- नाचणीतील कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
- फायबरमुळे पचनक्रियेला मदत होते.
- भाज्यांमधून विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
- गरमागरम सूप हिवाळ्यातील जेवणाला पौष्टिक जोड ठरते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुढील लेख
महात्मा जोतिबा फुले संपूर्ण माहिती Mahatma Jyotirao Phule