मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (12:51 IST)

चमचमीत आणि चविष्ट शाही पनीर

लग्न समारंभ असो किंवा काही ही उत्सव किंवा वाढदिवस समारंभ असो. शाही पनीर अतिशय आवडणारी रेसिपी आहे. कदाचितच असे कोणी असेल ज्याला शाही पनीर किंवा पनीरचे पदार्थ आवडत नाही. शाही पनीरचे वैशिष्टये आहे की ही रेसिपी खाण्यात जेवढी चविष्ट असते, बनवायला तेवढीच सोपी असते. 
 
चला तर मग शाही पनीर करण्यासाठीची सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
 
साहित्य - 200 ग्रॅम ताजे पनीर, 2 टॉमेटो, 2 चमचे खसखस, 2 ते 3 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 2 चमचे दही, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण पाकळ्या, 1/4 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ चवीपुरते, 2 चमचे लोणी, 2 चमचे तूप (तळण्यासाठी), काजू, मनुका, मलई सजविण्यासाठी, बारीक चिरलेली कोथिंबीर.
 
कृती - 
शाही पनीर बनविण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे लांब चौरस तुकडे करून तुपात तळून पाण्यात टाकून द्या. टॉमेटो, खसखस, हिरव्या मिरच्या, आलं लसणाची पेस्ट करून घ्या. आता तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, लवंग आणि काळी मिरीची फोडणी तयार करावी. आता या तुपात पेस्ट घालून चांगली परतून घ्या. ग्रेव्ही तयार झाल्यावर पनीर घालून उर्वरित सर्व मसाले टाकून चांगल्या प्रकारे मिसळा. आता या मध्ये दही, लोणी टाकून एक उकळी घ्या. आता काजू मनुका (बेदाणे) आणि मलईने सजवा. शाही पनीर तयार. गरम शाही पनीर पोळी किंवा पराठे सह सर्व्ह करा.