बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (11:24 IST)

उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस

साहित्य - 
5 चमचे किसलेलं नारळ, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आलं-हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, बेदाणे, काजू, 3 -4 उकडलेले बटाटे, 3 चमचे एरोरूटच पीठ, तेल किंवा तूप तळण्यासाठी.
 
सारणाची कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात किसलेलं नारळ घाला त्यामध्ये शेंगदाण्याच कूट घाला. या मध्ये आलं-मिरची पेस्ट, काजू बेदाणे (किशमिश), कोथिंबीर, आणि लिंबाचा रस आणि सैंधव मीठ घालून मिसळून घ्या.
 
पॅटीस बनविण्याची कृती - 
सर्वप्रथम एका भांड्यात उकडलेले बटाटे चांगल्या प्रकारे कुस्करून घ्या. या मध्ये एरोरूटच पीठ घाला. सैंधव मीठ घाला. चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि घट्ट गोळा मळून घ्या. आता आपल्या हातावर बटाट्याचे मिश्रण घ्या आणि त्याला हातानेच पुरीचा आकार द्या. त्यामध्ये नारळाचे सारण भरा आणि सर्व बाजूने त्याला एकत्र करून गोलाकार द्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तयार करून त्या बॉलच्या आकाराचे गोळे एरोरूटच्या पिठामध्ये रोळून घ्या.
 
आता कढईत शेंगदाण्याचं तेल किंवा तूप तापवायला ठेवा. तेल गरम झाल्यावर हे बटाट्याचे गोळे त्यात हळुवार सोडा. तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. आता या तळलेल्या पॅटिसांना टिशू पेपर वर काढून ठेवा. जेणे करून ते जास्तीचे तेल शोषून घेईल. 
 
चविष्ट गरम उपवासाचे बटाटा पॅटीस खाण्यासाठी तयार. हे पॅटीस हिरव्या चटणी आणि दह्यासह सर्व्ह करावे.