शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (10:17 IST)

नवरात्र उपवास विशेष : उपमा आणि खिचडी

वरईच्या तांदळाचा उपमा :
साहित्य : 
200 ग्रॅम वरईचे तांदूळ, किसलेलं नारळ, अर्धा चमचा लाल मिरची पूड, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचे जिरं पूड, 1 लिंबाचा रस, सेंधव मीठ चवीप्रमाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल किंवा तूप अंदाजे.
 
कृती : 
सर्वप्रथम वरई चे तांदुळांना धुवून मिक्सर मध्ये भगराळ वाटून घ्या. एक कढईत तूप किंवा तेल गरम करून त्यामध्ये जिरे पूड घाला. चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून गरजेपुरते पाणी आणि वरईचे तांदूळ किंवा भगर आणि तिखट, मीठ घाला.
 
आता हे 10 ते 15 मिनिटासाठी शिजवा. लिंबाचा रस मिसळा आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करावं कोथिंबीर आणि किसलेलं नारळ घालून भगरीचा उपमा सर्व्ह करा.  
 
 
*******
 
चमचमीत आणि चविष्ट साबूदाण्याची खिचडी 
साहित्य -
250 ग्रॅम साबुदाणा, 1/4 कप दाण्याचं कूट, 1 उकडलेला बटाटा, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा काळी मिरी पूड, 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या, 1लहान चमचा साखर, सेंधव मीठ चवीपुरती, लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उपवासाचे फरसाण.
 
कृती -
साबूदाण्याची खिचडी बनविण्यासाठी साबूदाण्याला 3 ते 4 तास भिजवून ठेवा. बटाटे सोलून तुकडे करा. एक कढईत तूप गरम करून त्यामध्ये जिरे, आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे घाला. नंतर चिरलेले बटाटे घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. शिजत आल्या वर त्यामधे भिजत टाकलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट घाला आणि मंद आचेवर वाफवून घ्या. त्यामधे मीठ, काळी मिरपूड आणि साखर घालून मिसळून घ्या. चविष्ट अशी साबूदाण्याची खिचडी कोथिंबीर, उपवासाचे फरसाण आणि लिंबू घालून सर्व्ह करा.