नवरात्र विशेष रेसिपी : कच्च्या केळीची चविष्ट टिक्की

Last Modified गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (14:49 IST)
नवरात्रीत देवी आईचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जिथे लोकं आपापल्या घरात घट स्थापना करतात. त्याच बरोबर पूजेसह उपवासाचे संकल्प देखील घेतात. नऊ दिवसांच्या उपवासात अन्न-धान्याशिवाय उपवास करणं कठीणच आहे पण उपवासासाठी अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बनवून खाऊ शकता. जे आपल्या उपवासात सात्विक होण्या सह आरोग्यासाठी देखील फायदेशीर असेल. जसे की कच्च्या केळीची टिक्की
बरेच लोकं उपवासात बटाट्यासह कुट्टूच्या पिठाचे, शिंघाड्याच्या पिठाचे सेवन करतात. पण आपण ह्या व्यतिरिक्त देखील काही वेगळे चविष्ट खाण्याची इच्छा बाळगता तर आपल्यासाठी कच्च्या केळीची टिक्की हे परिपूर्ण असणार. आपली इच्छा असल्यास आपण सेंधव मीठ घालून किंवा मीठ न घालता देखील बनवू शकता. प्रत्येक चव वेगळी आणि चविष्टच असणार.

साहित्य -
उकडलेले कच्चे केळे, उकडलेले बटाटे, कुट्टूचं पीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, तळण्यासाठी शेंगदाणा तेल किंवा तूप, सेंधव मीठ चवीपुरती.
कृती -
सर्वप्रथम बटाटे आणि कच्चे केळे उकडवून घ्या. केळी साला सकटच उकडा. आता केळीची साल काढून त्याला कुस्करून त्यामध्ये कुट्टूचं पीठ आणि चवीपुरती सेंधव मीठ घालून मिसळून घ्या. या मिश्रणाचे दाटसर घोळ बनवून ठेवून द्या.

आता उकडलेला बटाटा कुस्करून त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट, कोथींबीर आणि मीठ घाला. आता या सारणाचे लहान लहान पेढेगाठी गोळे बनवून ठेवा. त्याला हाताने टिक्कीचा आकार द्या.

आता गॅसवर कढई तापविण्यासाठी ठेवा. त्यामध्ये तूप किंवा शेंगदाण्याचं तेल घाला. तेल किंवा तूप गरम झाल्यावर बटाट्याच्या टिक्कीला केळ आणि कुट्टूच्या पिठाच्या दाटसर घोळात बुडवून गरम तेलात किंवा तुपात सोडा. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. आता या तळलेल्या टिक्किना एका ताटलीत टिशू पेपर वर काढून घ्या. जेणे करून टिशू सर्व तेल शोषून घेईल.

आता या टिक्की हिरव्या चटणीसह सर्व्ह करा. कच्च्या केळीने बनलेल्या या टिक्की चविष्ट तर असणारच. त्याशिवाय आरोग्यासाठी देखील चांगलीच असते आणि हे खाल्ल्यावर आपल्याला भूक देखील लागणार नाही.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका

निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका
अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला ...

Akshaya Tritiya Puja Vidhi : अक्षय तृतीयेला घरात सोप्या ...

Akshaya Tritiya Puja Vidhi : अक्षय तृतीयेला घरात सोप्या पद्धतीने करा पूजा
अक्षय तृतीया सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी भाविक भगवान विष्णूंची पूजा ...

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती शुभ मुहूर्त, ...

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा विधी
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला परशुराम जयंती साजरी ...

Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेला या 10 पैकी केवळ 1 उपाय करा, ...

Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेला या 10 पैकी केवळ 1 उपाय करा, अक्षय धन लाभ मिळवा
अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगळ कार्य मुर्हूत न बघता देखील करता येतात कारण हा दिवस शुभ ...

गजानन महाराज दुर्वांकुर

गजानन महाराज दुर्वांकुर
श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र - शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...