शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (09:52 IST)

नवरात्र विशेष : भगरीच्या किंवा वरईच्या तांदुळापासून चविष्ट उत्तपम बनवा

नवरात्राच्या नऊ दिवसात देवी आईची पूजा करण्यासह लोकं संपूर्ण नऊ दिवसाचे उपवास धरतात. या वेळी ते अन्नाला सोडून फलाहार करतात. ते आपले उपवास फळे खाऊन किंवा धान्य फराळ करून करतात. या मध्ये गहू, तांदूळ खात नसतात. अश्या परिस्थितीत दररोज खाण्यासाठी काही लागतं जी पोट भरण्यासह ऊर्जा देखील दे आणि सात्त्विकं देखील असायला हवे. आपण या साठी उत्तपम देखील बनवू शकता. जेणे करून आपली चव पालट तर होणारच त्याशिवाय काही वेगळा पदार्थ देखील होईल. 
 
हे उत्तपम रव्याचे नसून वरईच्या तांदुळाचे असतात. ज्याला आपण भगर किंवा मोरधन देखील म्हणतो त्याचे बनवतात. चला तर मग आपण याची रेसिपी जाणून घेऊ या. 
 
उपवासात बऱ्याच वेळा काही चविष्ट खाण्याची इच्छा होऊ लागते. उत्तपम अश्या परिस्थितीत चांगले पर्याय आहे. हे बनवताना आपण रव्याच्या ऐवजी वरईचे तांदुळाचा वापर करतो. ज्याला आपण उपवासात वापरतो. 
 
साहित्य -
1 कप भगर, 1 लहान चमचा जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, सैंधव मीठ चवीप्रमाणे, शेंगदाण्याचं तेल किंवा तूप.

कृती -
भगरीला दोन ते तीन तास भिजवून ठेवावं. पाणी काढून मिक्सर मध्ये हे बारीक डोस्याच्या सारणाप्रमाणे वाटून घ्या, आणि या मध्ये जिरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आणि सैंधव मीठ घाला. आता या सारणाला चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. 
 
आता गॅस वर तवा तापविण्यासाठी ठेवा त्यावर थोडं तेल किंवा तूप सोडा. त्यावर लहान-लहान आकाराचे उत्तपम तयार करा. 
 
गॅस मध्यम करून याला झाकून द्या. एका बाजूनं शेकल्यावर याला पलटी करून द्या. दोन्ही बाजूनं चांगल्या प्रकारे शेकल्यावर हे गरम उत्तपम बटाट्याच्या भाजीसह किंवा उपवासाच्या चटणी सह सर्व्ह करा.