Daily Horoscope
✕

चायनीज ट्विस्ट, मसालेदार आणि चटपटीत शेजवान पोहा एकदा नक्की चाखून बघा

Updated: शनिवार, 5 सप्टेंबर 2026 (15:58 IST)
साहित्य-
जाड पोहे - २ कप
शेझवान सॉस - २ चमचे
टोमॅटो केचप (सॉस) - १ चमचा
सोया सॉस - १/२ चमचा
लिंबू रस - १ चमचा
बारीक चिरलेला कांदा - १
बारीक चिरलेली शिमला मिरची - १/२ कप
बारीक चिरलेली गाजर व कोबी - १/२ कप
मोहरी आणि जिरे - प्रत्येकी १/२ चमचा
हिरवी मिरची - २ (चिरलेली)
तेल - २ मोठे चमचे
मीठ व साखर - चवीनुसार
कोथिंबीर व शेव - सजवण्यासाठी
ALSO READ: रोजच्या पोहे-उपमा कंटाळवाणा झाला? मग ट्राय करा हे
कृती-
पोहे भिजवणे: पोहे स्वच्छ धुवून ५ मिनिटे चाळणीत निथळत ठेवावेत, जेणेकरून ते मोकळे होतील.
फोडणी देणे: कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे आणि हिरवी मिरचीची फोडणी द्या.
भाज्या परतणे: त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परता. नंतर शिमला मिरची, गाजर आणि कोबी घालून १-२ मिनिटे मध्यम आचेवर कुरकुरीत राहतील अशा परता.
सॉस आणि मसाले: कढईत शेझवान सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून सर्व साहित्य चांगले एकत्र करा.
पोहे मिसळणे: आता भिजवलेले पोहे कढईत घालून सॉस आणि भाज्यांसोबत हलक्या हाताने मिक्स करा.
वाफ काढणे: झाकण ठेवून मंद आचेवर २ मिनिटे वाफ काढून घ्या. शेवटी वरून लिंबू रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम मसालेदार-आंबट-गोड शेझवान पोहा डिशमध्ये काढून वरून बारीक शेव पेरून सर्व्ह करा.
ALSO READ: पावसाळा स्पेशल कुरकुरीत पोहे पकोडे रेसिपी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Instant Recipe पोहा इडली
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

वजन कमी करायचे आहे? आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा; मिळेल फिटनेसचा फायदा

या योगासनाने पोटावरील चरबी कमी होईल, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : माता दुर्गेची कथा

साखरपुड्यासाठी साडी निवडताय? हे पर्याय नक्की पहा! Saree Options Engagement

Paneer Manchurian Recipe लज्जतदार चायनीज पद्धतीची डिश ''पनीर मंचुरियन''

पुढील लेख
Show comments