सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2022 (16:58 IST)

चमचमीत रगडा पॅटिस

रगडा पॅटिस हे सर्वानाच आवडणारे पदार्थ आहे. रगडा पॅटिस बनवायला सोपे आहे. हा चमचमीत पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडणारा आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
रगडा साठी लागणारे साहित्य -
2 वाटी- वाटाणे 
1 टीस्पून-लाल मिरची पूड  
1 टीस्पून तेल 
1/4 टीस्पून मोहरी 
1/4 टीस्पून जिरे 
1 टीस्पून आले लसूण पेस्ट 
1 चमचा गरम मसाला 
1 टीस्पून कोथिंबीर 
1टोमॅटो बारीक चिरून
2मोठा, चिरलेला कांदा 
1टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची 
1/2 टीस्पून हळद 
चवीनुसार मीठ 
 
पॅटिस बनविण्यासाठी साहित्य -
1/2 किलो उकडलेले बटाटे 
1 टीस्पून- आलं लसूण पेस्ट 
1/2 टीस्पून धणे पूड 
1/4 टीस्पून जिरे पूड 
1/4 टीस्पून हळद 
1/4 टीस्पून चाट मसाला 
चवीनुसार मीठ
1 /2 टी स्पून लाल तिखट 
1 /2 टी स्पून गरम मसाला 
3 चमचे कोथिंबीर 
1/2 वाटी ब्रेड क्रम्ब्स 
आवश्यकतेनुसार तेल 
 
कृती -
वाटाणे रात्री भिजत घाला. सकाळी कुकर मध्ये शिजवून घ्या त्यात  मीठ, हळद,  बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चार कप पाणी घालून कुकर तीन शिटी देऊन बंद करा. आता मंद गॅस वर हे राहू द्या.
रगडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅस वर कढई तापत ठेवा त्यात 2 चमचे तेल घाला. मोहरी, जिरे, आले लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला, घालून परतून घ्या. त्यात वाफलेले वाटाणे घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. 

पॅटिस बनविण्यासाठी बटाटे उकडवून मॅश करून घ्या त्यात  मीठ,हळद, धणेपूड,जिरे पूड, चाट मसाला, गरम मसाला, हळद ,आलं लसूण पेस्ट कोथिंबीर,हिरवी मिरची  आणि ब्रेड क्रम्ब्स घालून मिसळून घ्या. आता हातावर बटाट्याची गोळी घेऊन पारी तयार करून पॅटिस बनवा आणि हे पॅटिस  तेलात तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या. सर्व पॅटिस तळून घ्या.

आता पॅटिस गरम करून त्यावर रगडा घाला आणि वरून चिंचेची आंबट गोड चटणी हिरवी चटणी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक शेव घालून सर्व्ह करा.