गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2024 (12:38 IST)

Urad Dal Khichdi हिवाळ्यात खा गरमागरम उडीद डाळची खिचडी

Urad Dal Khichdi सामान्यपणे सर्वांच्या घरी विशेष दिवशी तसेच इतर दिवशी देखील खिचडी बनते खिचडी ही लाहन्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. तांदूळ, मूंगडाळ, मिक्सव्हेज आणि उडी‍द डाळ सोबत इतर धान्यांची पण खिचडी बनवली जाते. सगळे वेगवेगळ्या रेसिपीने आणि साहित्याने खिचडी बनवून खातात. आज आपण बनवू या उडीद डाळची खिचडी.
 
साहित्य 
२ कप तांदूळ 
२ कप उडिद डाळ
१ कप मटर 
१ कप फूल कोबी 
२ छोटे बटाटे कापलेले 
४ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या 
१ छोटा चमचा हळदी पावडर 
चिमुटभर हींग 
२ छोटे चमचे जीरे 
स्वादानुसार मीठ
दोन ते तीन चमचे तूप 
१ छोटा चमचा गरम मसाला 
 
कृती 
खिचडी बनवण्यासाठी नवीन तांदूळ आणि भिजवलेली उडीद डाळ धुवून बाजूला ठेवून दया. आता कुकरमध्ये एक चमचा तूप टाकून ते गरम करा. मग त्यात जीरे, हिरवी मिर्ची, हींग टाकून परता. त्यानंतर मटर, बटाटा, टोमॅटो आणि कोबी टाकून पाच मिनिट परता. भाजीमध्ये हळद तसेच गरम मसाला टाकून परता. भाजी शिजली की त्यात उडीद डाळ आणि तांदूळ टाकून परता. आता ३ ते ४ कप पाणी टाकून झाकण लावा आणि ३ ते ४ शिट्टी घ्या तसेच खिचडी शिजवा. मग शिजल्या नंतर चमचाने सर्व एकत्रित करा व बाऊल मध्ये काढा. त्यावर हिरवी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.