1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

अटेन्शन प्लीज..!

अटेन्शन प्लीज
WD
पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते.

पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळय़ा हलक्या होतात.

शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. जास्त चवदार होतो.

पुरण शिजताना हरभर्‍याच्या डाळीतच चमचाभर तूरडाळ टाकली की, पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो.

मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करुन रव्याबरोबर लाडू करावेत.

बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात. खमंग होतात.

गोड बुंदी, बर्फीचे, लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे.

श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत, साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे.

आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते.

जान्हवी शिरोडकर