साहित्य : कणीक, कांदे २, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ, कोथिंबीर.
कृती : पोळीसाठी मळतो तशी कणिक मळुन घ्यायची.
ND
ND
सारण : कांदे पातळ उभे चिरुन घ्या. त्यात तिखट, मिठ, कोथिंबीर घालुन थोड्या तेलात परतुन घ्यावे. सारण गार झाले की पुरणाच्या पोळीत पुरण भरतो तसे भरावे. आणि लाटावे व नेहमीचे पराठे भाजतो तसे तेल टाकुन भाजावे. कांदा पोळी लाटताना थोडा बाहेर येतो, तो येऊ द्यावा, तो तव्यावर भाजला गेल्यामुळे मस्त स्वाद लागतो.
गरम गरम पराठ्यावर मस्त साजुक तुप घालुन वाढावे, सोबत टोमॅटोचे सॉस द्यावे... आपण खुष.. कारण करायला सोप्पा आणि घरातले पण खुष..