गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

गोलगप्पे

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
गोलगप्यांचे एक पाकिट, मीठ घालून उकडलेले वाटाणे 2 वाट्या, 8-10 वाट्या भरून चिंचेचे आंबट-गोड पाणी.

कृती - एका प्लेटमध्ये गोलगप्पे घेऊन त्याला हाताने वरून फोडा. त्यात एक चमचा पांढरे वाटाणे घाला. पाणी एका वेगळ्या वाटीत द्या.

गोलगप्यांचे पाणी -
साहित्य - अर्धी वाटी चिंच उकळून, कोळून त्याचा गर, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 10-12 काड्या पुदिना, एक वाटी धुऊन चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, 5-6 काळे मिरे, 5-7 चमचे गुळ, अर्धा चमचा लाल तिखट.

कृती - सर्वांत आधी चिंच उकळून घ्यायची, मग ती थंड झाल्यावर ती कोळून घ्या नंतर त्यात गुळ टाका व पुदिना धुऊन घेऊन त्याची पाने बाजूला काढा. मिरच्यांचे बारीक तुकडे करा. आले किसून घ्या. एका ताटलीत कोथिंबीर, पुदिन्याची पाने व वर दिलेले सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक कर. या चटणीला साधारण मध्यम आकाराच्या पातेलीभर पाण्यात मिसळा व हलवा. झाले पाणी तयार. ‍‍‍‍तिखट व मीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता.