साहित्य : अर्धा किलो भेंड्या, 3-4 हिरव्या मिरच्या, चार-पाच चमचे साखर, अर्धी वाटी दही, मीठ, दाण्याचे कूट अर्धी वाटी, फोडणीकरिता चार चमचे तूप, एक चमचा जिरे, कोथिंबीर.
कृती : भेंड्या धुऊन फडक्याने कोरड्या करून,
PBarnale
मग चिराव्यात. तुपाची फोडणी करून त्याच चिरलेल्या फोडी घालाव्यात व दही, साखर, चवीप्रमाणे मीठ व हिरव्या मिरच्या वाटून व दाण्याचे कूट हे सर्व साहित्य घालून भाजी शिजवावी. शिजल्यानंतर कोथिंबीर घालावी.