दुधाची दशमी
प्रवासात टिकणारे खाद्यपदार्थ
साहित्य : 3 वाट्या कणिक, अंदाजे दूध, अर्धा चमचा मीठ, मोहनासाठी 2 लहान चमचे तूप. वरून भाजण्यासाठी तूप. अर्धा चमचा ओवा पूड. कृती : एका भांड्यात कणिक घेऊन, मोहनासाठी थोडे तूप गमर करून कणकेवर ओवा, थोडे मीठ घाला, अर्धा चमचा ओवा पूड घाला, चांगले मिसळून घ्या, थोडे थोडे दूध घालून पीठ भिजवून ठेवा. अर्धी तासांनी चांगले मळून तेलाचा हात घेऊन घडीच्या पोळ्या लाटा. गरम तव्यावर पोळी भाजून दोन्ही बाजूंनी तूप सोडा. पोळी लालसर भाजून घ्या. दोन दिवसापर्यंत अगदी नरम अशी दशमी चवदार वाटते. कोरड्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत ही दशमी खायला द्या.