कृती : फ्लॉवर स्वच्छ करुन घ्या, मात्र तो बारीक करु नका, त्याची फुलं तशीच ठेवा. उकळत्या पाण्यात मीठ, हळद टाका आणि त्यत दहा ते पंधरा मिनिटं फ्लॉवरची ही फुलं ठेवा. त्यातला कचरा, कीड निघून जाईल. आत ही फुलं बाहेर काढा, त्यांना थोडं तिखट-मीठ लावून चाळणीवर ठेवून वाफवावे, तशी ही फुलं वाफवून घ्या ती कच्ची राहायला नकोत, पण गच्च शिजून मऊही व्हायला नकोत. आता नेहमीप्रमाणे तिखट, मीठ, हिंग घालून भज्यांचं पीठ तयार करुन घ्या. वाफलेलं एकेक फूल त्यात बुडवा आणि तळा. ही सोनेरी फुलं सॉसबरोबर अप्रतिम लागतात.