राजगिर्याची तिखट खमंग पुरी
साहित्य : साबुदाणा पीठ पाव वाटी, राजगिरा पीठ 3 वाटी, वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा, पाव वाटी दाण्याचे बारीक कूट, अर्था चमचा जिरेपूड, पाव वाटी दही, चवीनुसार शेंदेमीठ, मोहनासाठी तेल.कृती : एका भांड्यात राजगिर्याचे पीठ घ्या. साबुदाणा पीठ, दाण्याचे कूट, वाटलेली हिरवी मिरची व जिरेपूड घाला, शेंदेमीठ घाला, कडकडीत तेलाचे मोहन घाला, थोडे दही घालून सारखे करून घ्या, व हव्या त्या प्रमाणात पाणी लावून पीठ मळून घ्या. लहान-लहान आकारात राजगिर्याचे पीठ लावून पुर्या लाटून घ्या. गरम तेलावर पुरी लालसर रंगावर तळून घ्या. बटाट्याच्या भाजीसोबत खायला द्या.