मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

व्हेज बर्गर

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : वाफवलेले मटरचे दाणे 1 कप, किसलेलं गाजर अर्धाकप, चिरून वाफवलेला फ्लॉवर अर्धा कप, बटाटे 3-4 (उकडलेले), गरम मसाला 1 टी स्पून, धणे-जीरेपूड 1 टी. स्पून, लाल तिखट 1 टी. स्पून, मीठ, तेल.

तिखट चटणी : कोथिंबीर, पुदिना, मिरची, आले, लसूण, जिरे, चिंच, मीठ सर्व एकत्र बारीक वाटा.

कृती : उकडलेले बटाटे किसून घ्या. त्यात इतर सर्व भाज्या मसाले, मीठ घालून एकत्र करा. 3 ते 4 ब्रेड स्लाईस पाण्यात भिजवून पिळून ते या मिश्रणात घालून सर्व एकत्र करा ‍आणि समान आकाराचे कटलेट बनवून फ्राय करा.