सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

शाही कोहळा

शाही कोहळा पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 250 ग्रॅम कोहळा, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, पाव चमचा मेथीदाना, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, मोहरी, जिरं, चिमुटभर हिंग, मीठ चवीनुसार, 1 चमचा धने पूड, 1 मोठा चमचा तेल, कोथिंबीर चिरलेला.

कृती : कोहळ्याचे सालं काढून त्याचे लांब लांब काप करून घ्यावे. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे व मेथीदान्याची फोडणी घालून त्यात हिरव्या मिरच्या टाकाव्या. वरून कोहळ्या फोडी घालून झाकण ठेऊन द्यावे. 4-5 मिनिटाने जेव्हा कोहळा पूर्णपणे शिजून जाईल तेव्हा कोथिंबीर व लिंबू घालून सर्व्ह करावे.