शेजवान फ्राइड राइस
साहित्य: 2 कप तांदूळ, 2 कप भाज्या (भोपळी मिरची, गाजर, कोबी) 1 टोमॅटो, 1 कांदापात, 1 चमचा लालचुटूक मिरच्या भिजवून वाटलेली पेस्ट, मीठ, मिरेपूड, अर्धा चमचा सोया सॉस, पाव चमचा अजिनोमोटो, 3 चमचा तेल.
कृती: तांदळाचा मोकळा भात करून गार होऊ द्या. सर्व भाज्या लांबट आकारात चिरा. तेल गरम करून त्यात सर्व भाज्या घाला व लगेच अजिनोमोटो घालून परता म्हणजे भाज्यांचा रंग चांगला राहील. त्यावर भात घालून हलक्या हाताने परता. मिरच्यांची पेस्ट, सोया सॉस, मीठ, मिरेपूड. घालून परता व गरमागरम सर्व्ह करा.