बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , शनिवार, 8 मार्च 2008 (13:48 IST)

अस्तित्वातून यशाकडे;तिचे जगणे साजरे करुया

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने 8 मार्च 2008 रोजी केंद्र सरकारतर्फे एक विशेष ध्वज तयार करण्यात आला आहे. ध्वजावर महिला दिनाचे घोषवाक्य ''अस्तित्वातून यशाकडे : तिचे जगणे साजरे करुया'' असे आहे. ध्वजावर रेखाटलेल्या इंद्रधनुष्यात स्त्रियांची मानसिक स्थिती, भविष्याची उमेद, आकाशात घेतलेली झेप आणि विश्र्वास व्यापून राहिलेली सर्वसमावेशकता दिसून येते.

इंद्रधनुष्याचे रंग कर्तृत्वाची एक नवीन भरारी दर्शविते. स्वातंत्र्याच्या दिशेने होणारी भारतीय स्त्रियांची वाटचाल आणि जगण्याची एक नवी उमेद यातून सूचित होते. लाल रंगातील पट्टा कालप्रवाहातील गतीमानता व उंच भरारी दर्शवितो. इंद्रधनुष्यातील हे रंग स्त्रीच्या नव्या आशा, त्याला असणारे विविध कंगोरे, कौशल्य, आत्मविश्र्वास, समाजातील तिचे स्थान उलगडून दाखवितात. इंद्रधनुष्यातील हे रंग एक आशा पल्लवित करते. स्त्रीचे अस्तित्व टिकविण्यासाठी केलेली धडपड येथून तिचा सुरु होणारा प्रवास यशापर्यंत घेऊन जाणारा ठरतोय. त्यामुळे असा एक समाज निर्माण होईल की, जिथे स्त्रियांवरच्या अत्याचाराचे अस्तित्वच नष्ट झाले आहे आणि भविष्यकाळात स्त्रियांच्या कपाळावरील चिंतेच्या जागी आनंदाचे क्षण विसावणार आहेत.