उपेक्षित नारी
सौ. स्वाती दांडेकर
मी एक उपेक्षित नारी समाजाचीआपल्या पोटाची भूख भागविण्या साठीकरते शांत भूख रोज दुसर्याची ।।1।।असले मी किती उपेक्षित जरीतुमच्या ह्या शुभ्र समाजासाठीकाळे डाग त्याचे मीच लपविलेपोर्णिमेच्या रात्रीत ही ।।2।।घाव माझ्या अंतरीचेकसे दाखवु तुम्हा तेव्यथा माझ्या जीवनाची बनते कहाणी तुमच्या मासिकाचीसोडुनी एक उसासा माझ्या साठीबिचारी म्हणुन संपते गोष्ट माझ्या जीवनाची ।।3।।नचरेचे बाण सोसते अंगावरीस्पर्शाने सरसरते काया माझीशाब्दीक मार सहन करते हृदयावरीमृत मन, बधीर तन,घेऊन रोज मरते, रोज जगतेद्रोपदी मी कलियुगाची,निज, आस असते एक कृष्णाची ।।4।।वंशवेल वाढवते अज्ञान पित्याचीकोणते नांव देऊ मुलांस मीआंधळी कोशिंबीर खेळतात हे जीवनाशीवारसा देते त्यांना एक निराश्रीत जीवनाचाइच्छा असे मानसी बनु सावली वट वृक्षाची ।।5।।कहाणी नाही ही माझ्या एकटीची असे अनेक माझ्या भगिनीचीमागणे एक ह्या सुसंकृत समाजाशीघ्या पुढार आमच्या साठीमायेच्या कुशीत घ्या माझ्या लेकरांनाशुभ्र आरसा त्यांना बनु द्याप्रतिंबिंब असो त्यांच्याच सारखेहेच सांगुन माझी कहाणी संपवते