रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 मार्च 2024 (09:02 IST)

Women's Day Wishes 2023 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

women day
आदिशक्ती तू, 
प्रभूची भक्ती तू, 
झाशीची राणी तू, 
मावळ्यांची भवानी तू, 
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, 
आजच्या युगाची प्रगती तू 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू, 
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर 
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,
माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस 
महिला दिनाच्या शुभेच्छा…
 
स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे जीवनभराची साथ 
हे स्त्री तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
 
नारी ही शक्ती नराची,
नारीच हीच शोभा घराची,
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
 
मला जन्म देणाऱ्या आणि या सृष्टीला जन्म देणाऱ्या 
अनंत मातांना माझा साष्टांग नमस्कार… 
जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा 
 
ती भीत नाही म्हणून ती खंबीर नाही
तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
 
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व,
जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…
 
ती आई आहे, 
ती ताई आहे, 
ती मैत्रिण आहे, 
ती पत्नी आहे, 
ती मुलगी आहे, 
ती जन्म आहे, 
ती माया आहे, 
ती सुरूवात आहे 
आणि तिच नसेल तर 
सारं काही व्यर्थ आहे. 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
विधात्याने घडवली सृजनांची सावली, 
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी. 
महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक 
तर कधी धगधगती ज्वाळा, 
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो 
चंदेरीसोनेरी उजाळा...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
 
तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, 
तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता....
महिला दिनाच्या शुभेच्छा....