1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 मार्च 2024 (10:26 IST)

Women Day 2024 : महिलांसाठी सुरक्षित आहे हे प्रेक्षणीय स्थळ, नक्की भेट दया

महिला या प्रवास करण्यापूर्वी खूप विचार करतात. जर कुटुंब सोबत असेल किंवा सोबत कुटुंबातील एखादा पुरुष असेल तर महिलांसाठी प्रवास सुरक्षित मनला जातो. महिलांना प्रवास करतांना अनेक वेळेस समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रवास करतांना सर्वात मोठ ध्येय सुरक्षिततेचे असते. खासकरून जेव्हा नविन स्थान असेल. या वर्षी अंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त फिरायला जाण्यासाठी योजना बनवून आई, बहिणी, मैत्रिणीं सोबत फिरायला नक्कीच जाऊ शकतात. तर चला जाणून घ्या कुठे जाऊ शकतात. 
 
मुन्नार- भारतातील सर्वात सुरक्षित प्रेक्षणीय स्थळांपैकी मुन्नार एक स्थळ आहे. महिला टेंशनफ्री होऊन मुन्नार चाहा बाग, नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवेगार वातावरण पहायला नक्कीच जाऊ शकतात. सोलो वुमन ट्रैवलर्ससाठी ही एक चांगली जागा आहे. 
 
कुफरी- हिमाचल प्रदेशातील शिमलाजवळ एक छोटेसे हिल स्टेशन आहे. ज्याचे नाव कुफरी आहे. कुफरी मध्ये तुम्ही सुंदर सरोवर, बर्फाने झाकलेले पर्वत असे सुंदर दॄश्य पाहण्यास मिळतात. ही जागा महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने फिरण्यासाठी चांगली आहे . 
 
दार्जिलिंग- पश्चिम बंगालमधील शहर दार्जिलिंगला पर्वतांची राणी बोलले जाते. दार्जिलिंग नेहमी महिला पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. या छोट्याश्या शहरात बौद्ध मठ, चिडियाघर, नैसर्गिक सुंदरता, सुंदर आनंदी वातावरण आणि फिरण्यासाठी अनेक रमणीय स्थळे आहेत. दार्जीलिंगची ओळख चाहाचे बगीचे, पर्वत, मंदिर, मठ तसेच टॉय-ट्रेन मुळे आहे. 
 
जयपुर- पिंक सिटी नवाने प्रसिद्ध जयपुर सुरक्षेच्या दृष्टीने महिला ट्रैवलर्ससाठी  चांगले आहे. जयपुर मध्ये हवा महल, जल महल, सिटी पैलेस, आमेरचा किल्ला, जंतर-मंतर, नाहरगडचा किल्ला, जयगडचा किल्ला, बिरला मंदिर, गोविंद देवजी मंदिर इथे फिरू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik