Last Modified: नाशिक , सोमवार, 3 मे 2010 (13:21 IST)
आयुर्विज्ञान विज्ञापीठाच्या परीक्षा रद्द
महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या आज होणा-या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी दिली आहे.
एम-युएचएचच्या मेडीकल, डेन्टल, आयुर्वेद, युनानी व होमीओपॅथी विद्याशाखांच्या आज होणा-या परीक्षा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील 130 केंद्रांवर आज या परीक्षा होणा-या होत्या.