Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (14:03 IST)
दहशतवादी आले कुठून ?
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अतिशय गर्दी असणारे छ. शिवाजी टर्मिनस (सीएसटी), पंचतारांकीत हॉटेल ताज व ओबेरॉयमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार करून मुंबई लक्ष्य केले आहे. तसेच मुंबईच्या काही भागात बॉम्बस्फोटही घडविले आहेत. मुंबईत सुरक्षा यंत्रना मुजबूत असताना ही दहशतवादी हे आले तरी कुठून, असा प्रश्न मुंबईकरांसह सर्वसामान्य देशवासीयांना पडला आहे.
मानवतेला काळीमा फासणार्या या घटनेत आतापर्यंत 100 ठार तर 300 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. 11 पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. मुंबईच्यात तर सार्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. दहशतवादी आले कुठून, यासंदर्भात दिशाहिन झालेल्या महराष्ट्र सरकारचे विचारप्रवाह ही भरकटलेले दिसत आहेत.
मुंबईत हल्ला करणारे दहशतवादी सागरीमार्गाने आले असून त्यांनी एका बोटीचा वापर केला आहे, असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. दहशतवादी सागरीमार्गाने मुंबईची सुरक्षा सीमारेषा ओलांडत होते तेव्हा नेव्हीचे कर्मचारी होते कुठे? असा ही प्रश्न निर्माण झाला आहे. तर दहशवादी हे गुजरातमधून आले असल्याचे मत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मांडले आहे. दहशतवादी आले हे मात्र नक्की. मुंबईत हल्ला होणार असल्याचे गुजरात सरकारने पाच दिवस अगोदरच महराष्ट्र सरकारला कळविले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याचा इन्कार केला आहे. जर पाच दिवस अगोदर महाराष्ट्र सरकारला मुंबईत हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु कुठल्याच प्रकारची सुरक्षा यंत्रना उभी करण्यात आली नाही. मुंबईत हॉटेल ताज, ओबेरॉय व छाबरा येथे दहशतवादी घुसून बसले असून त्यांनी शेकडो नागरिकांना बंदिस्त केले आहे. एवढे असून देखील महराष्ट्र सरकार दहशतवादी आले कुठून या मुद्यावरच अडून बसले आहे.