Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (13:15 IST)
निफ्टी आणि बीएसई आज बंद
मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) व निफ्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारी मुंबईत झालेल्या मालिकाबध्द स्फोटामुळे आणि दहशतवाद्यांनी हॉटेल ताज व ओबेरॉयमध्ये अनेक जणांना बंदी बनवून ठेवल्याने एनएसजीने कारवाई सुरू केली असून मुंबईच्या सुरक्षेसाठी आज हा बंद ठेवण्यात आला आहे. यापूर्वीही मुंबईवर अनेक हल्ले झाले आहेत. मात्र 1993 वगळता आजवर कधीही शेअर बाजार बंद ठेवण्यात आलेला नाही. मात्र आज झालेला हल्ला हा सर्वात मोठा आहे. त्या पार्श्वभूमीवर हा बंद ठेवण्यात आला आहे.