शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वार्ता|

पंतप्रधान व अडवानी एकत्र मुंबईला जाणार

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंह व लोकसभेचे अपक्ष नेता लालकृष्ण अडवानी एकत्र जाणार आहेत.

अडवानी यांनी त्यांच्या राहत्या घरी गुरूवारी पत्रकारांना सांगितले की, ते मुंबईला एकटेच येणार होते. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या समोर सोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अडवानी यांनी पंतप्रधान यांचा प्रस्ताव स्विकारला आहे. मुंबईत हल्ला झाल्यानंतर ते मनमोहन सिंग यांच्या संपर्कात असून आतापर्यंत दोनवेळा संपर्क झाला आहे. असेही अडवानी यांनी सांगितले.