शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वार्ता|
Last Modified: इस्लामाबाद , सोमवार, 3 मे 2010 (14:16 IST)

पाकिस्तानकडून मुंबईतल्या दहशतवादाचा निषेध

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर जोरदार टीका केली असून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

भारतावर कोसळलेले संकट हे पाकिस्तानचेही संकट आहे, असे म्हणून त्यांनी परिपूर्ण सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे. दहशतवाद ही संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. पाकिस्तानलाही दहशतवादी कारवायाना दररोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी आपल्या संसाधनाचा एकत्र वापर करून दहशतवादाचा मुळापासून नायनाट केला पाहिजे.

पुढे त्यांनी सांगितले की, पाकिस्तानचे परदेशमंत्री शाह महमूद चार दिवसांच्या भारत दौर्‍यावर असून ते भारताला योग्य ते सहकार्य करतील.