शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (12:51 IST)

मुजाहिदीन आणखी हल्ले करणार?

मुंबईत झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी डेक्कन मुजाहिदीन नावाच्या संघटनेने स्वीकारली असून, आपल्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास याहीपेक्षा घातक हल्ले देशभरात करण्यात येतील असा इशारा या संघटनेने ‍दिला आहे.

संघटनेने हल्ल्यांनंतर एका वाहिनीला पाठवलेल्या इ-मेलमध्ये ही धमकी दिली असून, जगभरात आपल्या धर्मीयांवर अन्याय होत असून, आता आपली सहनशीलता संपल्याचे या मेलमध्ये म्हटले आहे.

सिमी आणि इंडियन मुजाहीदीन प्रमाणेच या संघटनेने मेल करून अशा स्वरूपाची धमकी दिली असून, इंडियन मुजाहीदीनने नाव बदलून हे हल्ले केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.