कॅनडाकडून मुंबई हल्ल्याचा तीव्र निषेध
दक्षिण मुंबईत काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात कॅनडाचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्स केनन यांनी निषेध व्यक्त केला. मुंबईतील निरापराध जनतेला हकनाक दहशतीच्या वातावरणात जगावे लागत आहे. अशा प्रकारच्या वातावरणातून लोकांना सुरक्षित आणि दहशतवादाविरोधी एकत्र मिळून सामना करावा, असे सांगितले. हल्ल्यात एका केनियन नागारीकांचा बळी गेला नसल्याचे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे दिलेल्या शोक संदेशात म्हटले आहे.