शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

केंद्रीय मंत्रीमंडळाची तातडीची बैठक

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महनमोहन सिंग यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.

दहशतवादाच्या या सर्वांत मोठ्या हल्यामुळे भारत चांगलाच हादरला आहे. दहशतवाद्यांनी कोणाचीही पर्वा न करता भर रस्त्यावर दहशत माजवली. यामध्ये 12 पोलिस अधिका-यांना प्राण गमवावे लागले. दहशतवादाला चोख प्रतिउत्तर देण्याची गरज निर्माण झाली आहे. आता केवळ चिंता व्यक्त न करता ठोस कारवाई करण्यासाठी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी कॅबीनेटची तातडीची बैठक बोलावली आहे.

दिल्‍लीत आपात्‍कालीन कॅबिनेट बैठक

नवी दिल्‍ली

मुंबईतील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर देशभर हायअलर्ट जारी करण्‍यात आला असून पंतप्रधानांनी दिल्‍लीत कॅबिनेट मंत्रीमंडळाची आज तातडीची बैठक बोलावली आहे.

दहशवादी देशाच्‍या आत येऊन एवढा मोठा हल्‍ला करतात. तोपर्यंत सुरक्षा यंत्रणा आणि गुप्‍तचर विभागाला काहीही माहिती मिळत नाही हे कसे असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून या संदर्भात पुढील दिशा ठरविण्‍यासाठी ही बैठक बोलावण्‍यात आली आहे. एकीकडे मुंबईत कमांडोची कारवाई सुरू असताना दहशतवाद उखडून टाकण्यासाठी तातडीची बैठक घेतली आहे. एरवी केवळ चिंता व्यक्त करणारे मंत्रीमंडळ कोणता निर्णय घेते, यावर सर्वांचे लक्ष आहे.