दहशतवादी बोटीतून आले- मुख्यमंत्री
मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी बोटीतून आले होते. त्यांनी दहा ठिकाणांना आपल्या कारवायांचे लक्ष्य केले, अशी माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली. मात्र, हे दहशतवादी किती आहेत, याची नेमकी संख्या माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. आज पहाटे पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले. नऊ संशयितांना ताब्यात घेतले गेले आहे. दहशतवादी हल्ल्यांची सुरवात रात्री नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान झाली. बोटीतून आलेल्या या अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.